breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई पोलिसांनी लुडोचा फोटो शेअर करत दिला संदेश

लॉकडाऊनच्यकाळात वेळ घालवण्यासाठी अनेकजण वेगवेगळा मार्ग काडत आहेत..कुणी गेम खेऴतय तर कुणी नवनविन रेसिपीज् शिकत आहे..काही जणांनी तर स्वत:चं युटयुब चॅनल काढून त्यावर काहीतरी  वेगळ करण्याच प्रयत्न करत आहे. त्यातल्या त्यात मोबाईलवर लूडो गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या खेळात डायसवर 6 पडेपर्यंत टोकन्स  म्हणजे सोंगट्या बाहेर पडत नाही. डायसवर 6 पडल्यानंतरच टोकन्स बाहेर येतात व खेळ सुरू होतो. लाहन मुलांनपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडता हा गेम आहे..आणि याच गेमची ट्रीक वापरून मुंबई पोलिसांनी लुडोच्याच साहय्याने बाहेर न पडणेच हे सर्वात सुरक्षित कसे आहे याचा संदेश दिला आहे.

मुंबई पोलिस हे आपल्या हटके सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखले जातात. आता मुंबई पोलिसांनी लूडोचा फोटो शेअर करत घरातच राहणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, चारही रंगाचे टोकन्स आपआपल्या घरातच आहेत. मात्र घराच्या बाहेर पडल्यास एका विचित्र धोक्याला सामोरं जावं लागू शकतं. बोर्डवर पोलिसांनी कोरोना व्हायरसचे चिन्ह देखील दिले आहे. पोलिसांनी हा फोटो ट्विटरवर अपलोड केला आहे .

नेटकऱ्यांना देखील मुंबई पोलिसांची जागृकता पसरविण्यासाठी वापरलेली क्रिएटिव्हिटी खूपच आवडली. ट्विटरवर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.पोलिसांच्या युक्तीचं सर्वांनीच  कौतूक  केलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button