breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लोकसभा निवडणुक; नाव मतदार यादीत आहे का? तर चला मग बघूया

मुंबई – लोकसभा निवडणूक २०१९चे बिगुल वाजले असून, देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. रविवारी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. मतदानापूर्वी तुमचे नाव मतदार यादीमध्ये आहे की, नाही हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आता घरबसल्या आॅनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे नाव अवघ्या काही मिनीटात तपासू शकता.

त्यासाठी तुम्ही http://103.23.150.139/marathi/ या संकेतस्थानवर लॉग इन करून तुमच्या नावाबाबतची खात्री करू शकता.

या संकेतस्थळावर गेल्यावर तुम्हाला दोन पर्याय दिसतील,

* Name Wise
* Dsitrict wise

* Name Wise वर गेल्यास मग डिस्ट्रीक्ट, तुमचे पहिले नाव, शेवटचे नाव, मधले नाव असे पर्याय दिसतील. तसेच ही यंत्रणा मनुष्य हाताळत आहे हे तपासून पाहण्यासाठी काही आकड्यांची बेरीज तुम्हाला करायला सांगण्यात येईल. हा मजकूर भरल्यानंतर ‘सर्च’वर क्लीक केल्यास तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत दिसले.

* Dsitrict wise वर गेल्यास मग डिस्ट्रीक्ट आणि तुमचा वोटर आयडी कार्ड क्रमांक, काही आकड्यांची बेरीज हा मजकूर दिसेल. हा मजकूर भरल्यानंतर ‘सर्च’वर क्लीक केल्यास तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत दिसले.

त्यामुळे आता वेळ न दवडता वरील नमूद  संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही? याची माहिती घ्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button