breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आगामी लोकसभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पुण्यात बैठक

पिंपरी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व महत्वाच्या सूचना देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची येत्या शनिवारी (दि. 14) पुण्यात बैठक होणार आहे. पुणे आणि लगतच्या लोकसभा मतदार संघातील पुढील व्युवरचना ठरविण्यासाठी ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

 

अवघ्या दहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपापल्या जागा शाबूत ठेवण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघ सोडला तर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघावर शिवसेनेची छाप आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर मावळ तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर शिरूर लोकसभा मतदार संघाची भिस्त कायम आहे. या दोन्ही मतदार संघावरील पकड कायम ठेवण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहे.

 

येत्या शुक्रवारी पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे पक्षाच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेना, भाजप युती झाल्यानंतर पक्षाने कोणती भूमिका घ्यायची, या विषयावर उध्दव ठाकरे चर्चा करणार आहेत. यावेळी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या पदाधिका-यांना काम करण्याच्या अधिकृत सूचनाही देण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button