breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत ‘डबेवाला भवन’ उभारणार

महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

जेवणाऱ्या डब्यांच्या वितरणाच्या व्यवस्थापनाची ख्याती अटकेपार पोहोचलेल्या मुंबईच्या डब्बेवाल्यांना क्षणभर विश्रांती घेता यावी, त्यांना हक्काचे ठिकाण मिळावे, त्यांच्या कुटुंबांना सुविधा उपलब्ध करुन देता याव्या यासाठी मुंबईत ‘डब्बेवाला भवन’ उभारण्याचा ठराव पालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. प्रशासनाकडून हिरवा कंदिल दाखविल्यानंतर मुंबईत ‘डब्बेवाला भवन’ उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

डब्बेवाल्यांच्या डब्बे वितरणाच्या व्यवस्थापनाची महती विदेशातही पोहोचली असून निरनिराळ्या देशांमधून मुंबई भेटीसाठी येणारे पर्यटक आवर्जून डब्बेवाल्यांची भेट घेत असतात. तसेच विदेशातील शिष्टमंडळेही आपल्या दौऱ्यामध्ये डब्बेवाल्यांची भेट घेत असतात. ही बाब लक्षात घेता परदेशी शिष्टमंडळांना डब्बेवाल्यांची भेट घेता यावी यासाठी मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी ‘डब्बेवाला भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी पालिका सभागृहात मांडली होती.   डब्बेवाल्यांना आपल्या समस्या सोडविता याव्या, औषधोपचारासाठी मुंबईत येणाऱ्या डब्बेवाल्यांच्या कुटुंबियांची निवासाची सुविधा उपलब्ध करता यावी यासाठी ‘डब्बेवाला भवना’त सुविधा उपलब्ध करता येतील, असेही किशोरी पेडणेकर यांनी  सांगितले. हा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून आयुक्तांनी हिरवा कंदिल दाखविल्यानंतर ‘डब्बेवाला भवना’च्या उभारणीचा मार्ग मोकळा होईल.

दररोज दोन लाखांहून अधिक डबे

मुंबईमधील विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरचा जेवणाचा डब्बा पोहोचविण्याच्या कामाला १८७० मध्ये डब्बेवाल्यांनी सुरुवात केली. कालौघात मुंबईत कंपन्या, उद्योग, कारखान्यांच्या संख्येत वाढ होत गेली आणि नोकरदारांना घरच्या जेवणाचा डब्बा पोहोचविण्याचे डब्बेवाल्यांचे काम अविरतपणे सुरू आहे. सध्या तब्बल दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना जेवणाचा डब्बा पोहोचविण्याचे काम डब्बेवाले करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button