breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

40 हजारसाठी पांडुरंगची अडवणूक, रुग्णालयावर कारवाई करा : राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर | टीव्ही 9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना 40 हजार रुपये भरल्याशिवाय दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्या कोपरगावातील आत्मा मालिक हॉस्पिटलची मुजोरी समोर आली आहे. अगोदर पैसे भरा नंतरच उपचार करु अशी भूमिका घेणाऱ्या रुग्णालयामुळे पांडुरंग रायकर यांच्यासह अनेक कोरोना बाधित रुग्णांची ससेहोलपट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी या रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी पुण्यात रायकर यांच्या उपचाराबाबत झालेल्या अनास्थेची देखील चौकशी करण्याची आणि कारवाईची मागणी केली. कोपरगाव येथील आत्मा मालिक हॉस्पिटल एव्हर हेल्दी समुहाकडून चालवले जाते. या रुग्णालयात अनेक रुग्णांकडून उपचारासाठी लूट केली जात असल्याचा आरोप होत आहे. महात्मा फूले आरोग्य योजनेत बसत असतानाही रुग्णालयाने रुग्णांकडून हजारो रुपये अनामत रकमेच्या नावाखाली उकळल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. टिव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी पांडूरंग रायकर यांना देखील रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि आडमुठेपणामुळे त्रासाला सामोरे जावे लागले.

पांडुरंग रायकर यांचा कोपरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर कोपरगावचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसौंदर यांनी रायकर यांना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. रिपोर्ट घेऊन ते आत्मा मालिक हॉस्पिटलला गेले असता तेथे रुग्णालय प्रशासनाने आधी 40 हजार रुपये भरा आणि त्यानंतरच दाखल करुन घेऊ, अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली. तसेच भरती करण्यास नकार दिला. रायकर यांना यावेळी श्वास घेण्यासाठी मोठा त्रास होत असताना रुग्णालयाने याकडे दुर्लक्ष केले.

रायकर यांच्या सहकाऱ्यांनी काही रक्कम भरण्याची तयारी दर्शवूनही रुग्णालय व्यवस्थापनाने 2 तास त्यांना गेटवरच ताटकळत ठेवले. यानंतर पत्रकारांनी जिल्हाधिकारी आणि तहसिलदार योगेश चंद्रे यांना संपर्क केला. तेव्हा रुग्णालय प्रशासन जागे झाले. रुग्णांसोबत दैनिक भास्करचे कोपरगाव प्रतिनीधी मोबिन खान हे स्वतः होते. त्यांनी रुग्णालयाचे व्यवस्थापक अमित फडतरे यांना सांगून देखील त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मोबिन खान यांनी स्वतः हा धक्कादायक प्रकाराविषयी माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button