breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: स्पेनमध्ये दिवसात सातशेहून अधिक बळी

स्पेनमध्ये करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या बुधवारी एकाच दिवसात सातशेहून अधिकने वाढल्यामुळे तेथील बळीची संख्या चीनहूनही अधिक झाली असून, तो आता इटलीनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

स्पेनमध्ये एकाच दिवसात ७३८ हून अधिक बळी गेल्याने तेथील मृत्यूसंख्या ३ हजार ४३४ झाली आहे. ३२८५ बळी गेलेल्या चीनला स्पेनने मागे टाकले आहे, असे तेथील आरोग्य मंत्रालयाने सांगितले. त्या देशातील करोनाग्रस्तांची संख्या २० टक्क्य़ांनी वाढून ४७,६१० झाली असून, ५ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.

स्पेनच्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा दबाव आला असून, हॉटेल्सचे रूपांतर रुग्णालयांत करण्यात येत आहे, तर बर्फाच्या एका स्केटिंग रिंकचा शवागासारखा वापर करण्यात येत आहे. देशातील संचारबंदी १२ एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी केली आहे.

ब्रिटिश राजघराण्याचे वारस असलेले ७१ वर्षांचे प्रिन्स चार्ल्स यांच्यात कोविड-१९ ची सौम्य लक्षणे आढळली असून त्यांनी स्कॉटलंडमधील राजघराण्याच्या एका वास्तूत स्वत:ला विलग केले असल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले. त्यांची पत्नी कामिला यांची चाचणी नकारात्मक आली आहे.

इटलीत ६९ हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून, ६ हजार ८०० लोकांचा या विषाणूने जीव घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button