breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रिया म्हणाली- सुशांत सिंह राजपूत तिला ड्रग्ज घ्यायला भाग पाडायचा

ड्रग्ज प्रकरणात मंगळवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने तीन दिवसांच्या चौकशीनंतर ही मोठी कारवाई केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान रियाने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. वारंवार नकार देऊनही सुशांत सिंह राजपूत आपल्याला ड्रग्ज घेण्यास भाग पाडायचा, असा दावा तिने केला आहे.

रिया सुरुवातीपासून एनसीबीशी सतत खोटे बोलत होती. मात्र सोमवारी तिने ड्रग्ज खरेदी केल्याचे मान्य केले आणि ती जे काही करायची ते ते सुशांतसाठी होते, असे ती म्हणाली आहे. मात्र स्वतः कधीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे ती म्हणाली होती. पण मंगळवारी जेव्हा रियाला हेच प्रश्न विचारले गेले, तेव्हा तिने पहिल्यांदा ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. यापूर्वी तिने फक्त ड्रिंक आणि सिगारेट ओढत असल्याचे म्हटले होते.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या पथकाने मोबाइल फोन, लॅपटॉप व टॅब्लेट इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅझेट रिया चक्रवर्तीच्या घरातून ताब्यात घेतले होते. वृत्तानुसार, या गॅझेट्सची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर ती 2017 पासून सतत ड्रग्ज सप्लायर्सच्या संपर्कात होती याचा खुलासा झाला. तपासणीत ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित लोकांचे फोटो, व्हिडिओ, व्हॉट्सअॅप चॅट्स, एसएमएसही उघड झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button