breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ!

 

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्याच्याच खात्यातील आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूण 33 अधिकाऱ्यांविरोधात 27 कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारी नंतर अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भष्टाचाराचा आरोप केला आहे. परमबीर सिंह हे 2015 ते 2018 याकालावधीत ठाणे पोलीस आयुक्त असताना आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला आहे.

पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावरच नाहीतर त्यांच्या कुटुंबावरही अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत. परमबीर सिंह यांची पत्नी इंडिया बुल्स कार्यालयात काम करतात. जिथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचसोबत परमबीर सिंह यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूरमध्ये मोठा व्यवसाय असल्याची माहितीही या पत्रातून देण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनीही परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने परमबीर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button