breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

घुसखोरांविरोधात मनसेचं धाडसत्र, ठाण्यात बांगलादेशींकडे आढळलं पॅन, आधार !

मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टिम 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलून हिंदुत्वाचा नारा दिल्यानंतर मनसैनिकांनी घुसखोरांची शोधमोहीम जोमाने हाती घेतली. मुंबईतील बोरीवलीत बांगलादेशी कुटुंब पकडल्याचा दावा मनसेच्या पदाधिका-यांनी केला. या बांगलादेशी कुटुंबियांकडे आधार-पॅनसारखी अधिकृत ओळखपत्रं सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील पातली पाडा परिसरातील किंगकाँगनगरमध्ये काही बांगलादेशी कुटुंब पकडल्याचा दावा केला. त्यापैकी एक महिला आपल्या पतीशिवाय मुलांना घेऊन राहते. पती काही वर्षांपूर्वी आपल्याला मुंबईत सोडून बांगलादेशला निघून गेल्याचं तिने सांगितल्याची माहिती त्यातून समोर आली आहे.

दुसऱ्या कुटुंबातील महिला बांगलादेशात विवाह करुन भारतात आली आहे. तिलाही दोन मुलं आहेत. धक्कादायक म्हणजे दोन्ही महिलांकडे आधारकार्ड, पॅन कार्ड इतकंच काय, तर व्होटिंग कार्डही आढळून आलं आहे. कुठलीही कागदपत्र नसताना ओळखपत्र मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे ते भारतीय असल्याचा पूर्ण पुरावा त्यांच्याकडे सापडला आहे.

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, त्याचबरोबर इतर कार्यकर्त्यांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यातून या बांगलादेशींना त्यांनी पकडलं आहे. याच विभागात आणखी 50 कुटुंबं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ही कुटुंबं आजूबाजूच्या घरात धुणी भांडी करुन, बिल्डिंगच्या साईटवर काम करुन आपला उदरनिर्वाह करतात, अशी माहिती मनसैनिकांनी सांगितली आहे.

विरार, बोरीवलीनंतर ठाण्यातही मनसेचं धाडसत्र

बोरीवली पूर्व चिकूवाडी परिसरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेनं काल गुरूवारी (दि. 13) आंदोलन केलं. त्यांना या भागात देखील बांगलादेशी राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी याभागात तपासमोहीम केली. संशयास्पद नागरिकांच्या घरी भेटी देऊन त्यांची कादपत्रे तपासली. त्यांची बोलीभाषा, पेहराव बांगलादेशी असल्याचं मनसेच पदाधिका-यांनी सांगितले. बोरीवली पोलिसांच्या तपासात वस्तीत राहणाऱ्या लोकांकडे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र आढळलं. त्यांची मजूर म्हणून पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नाही. कामाच्या शोधात कोलकाता, ओदिशामधून मुंबईत आल्याचा इथल्या लोकांनी सांगिलं. मोलमजुरी करुन दिवसाकाठी त्यांना 350 ते 400 रुपये मजुरी मिळते. पोलिसांना यात काही बालमजूरही आढळले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button