breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या स्पर्धेत ट्रम्प फक्त 13 तर विरोधी बायडेन 25 राज्यांमध्ये आघाडीवर

वॉशिंग्टन | राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाबाबत शंका-कुशंका सुरू असतात. ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकण्याची शक्यता गेल्या ४ महिन्यांत कधीच चांगली दिसली नाही. महाभियोगाच्या खटल्यातून मुक्त झाल्यानंतर त्यांची रेटिंग ३ वर्षांतील उच्च पातळीवर नक्की गेली, मात्र कोरोना संकट आणि जॉर्ज फ्लॉइडचे प्रकरण हाताळण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे श्रीयुत डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय बाजारभाव जमिनीवर आपटला आहे. कोरोनामुळे १ लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, ३ कोटी लोकांच्या नाेकऱ्या गेल्या आणि वंशवादावरील आंदोलनाबाबत त्यांच्या भूमिकेने विरोधी उमेदवार आणि बराक ओबामा यांचे आवडते उपराष्ट्रपती राहिलेले जो बायडेन यांना आघाडी दिली आहे.

एवढेच नव्हे तर बायडेन सहानुभूती मिळवण्यातही ट्रम्प यांच्यापेक्षा पुढे गेले आहेत. यामुळे दोघांमध्ये मोठा फरक निर्माण झाला आहे. जो बायडेन यांच्या आघाडीचा अंदाज यावरूनच लावता येईल की राष्ट्रपतिपदाच्या लोकप्रियतेबाबत ते फेब्रुवारीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा थोडेच पुढे होते. मग हे अंतर ५% राहिले. त्यानंतर १२% आणि जून येता येता बायडेन यांची आघाडी १४% झाली. राष्ट्रीय पातळीवर बघता सध्याच्या स्थितीत निवडणूक झाल्यास बायडेन अमेरिकेतील ५० राज्यांपैकी २५ मध्ये सरळ सरळ आघाडीवर आहेत, तर ट्रम्प केवळ १३ राज्यांमध्ये स्पष्ट विजय मिळवताना दिसत आहेत. ८ राज्यांमध्येे दोन्ही उमेदवार ५०-५० आहेत, तर ४ राज्यांमध्ये सध्या अनिश्चिततेची स्थिती आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार असल्याने दोघांकडे तयारीसाठी खूप वेळ आहे.

द इकॉनॉमिस्टने देशभरात सर्व्हे, राजकीय स्थिती, आर्थिक तथ्य आणि इतर घटना बघून मतदारांचा विचार, मतांची टक्केवारी आणि मतदारांच्या वागण्यातील बदल समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात अमेरिकेतील ५० राज्यांशी संबंधित या मुद्द्यांवरून हे समजण्याचा प्रयत्न केला आहे की, कोणत्या राज्याचे मतदार कसे वागतात. त्यानुसार एका विचारसरणीचे मतदार निवडणुकीत एकत्र राहण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जर मिनेसोटात जिंकतात तर त्यांची विस्कोन्सिनमध्येही जिंकण्याची शक्यता वाढते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button