breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

तणावाखाली सुशांतनं आत्महत्या केल्याची बाब स्पष्ट, 6 महिन्यांपासून नैराश्यावर सुरु होते उपचार…

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली . त्याने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचे आत्महत्येचे कारण अद्याप पुर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. या घटनेबद्दल माहिती घेत असताना नवीन माहिती समोर आली आहे…गेल्या ६ महिन्यांपासून सुशांत नैराश्यावर उपचार घेत असल्याची बातमी समोर आली आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुशांतने दुपारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतसिंग राजपुतने शनिवारी आपल्या काही जवळच्या मित्रांना घरी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. रात्री पार्टीला उशीर झाल्यामुळे सर्वजण उशिरा झोपले होते. सुशांतसिंग हा देखील त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. दुपार होऊन देखील सुशांत झोपेतून जागा झाला नाही म्हणून काही मित्रांनी त्याचे बेडरूमचे दार ठोठावले मात्र आतून दार बंद होते. बराच वेळ झाल तरी आतून काही प्रतिक्रिया येत नसल्यानं अखेर दार तोडून मित्रांनी आत प्रवेश केला. यावेळी सुशांतसिंगने गळफास लावून आत्महत्या केल्याचं चित्र त्याच्या मित्रांच्या डोळ्यांसमोर होत…


मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त झाला होता. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. घरातून त्याच्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्र आढळून आली आहे. यावरून सुशांतला नैराश्याने ग्रासले होते, व त्याच्यावर मागील सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते, अशी माहिती सध्या समोर आली आहे.तसेच त्याच्यात आणि त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती यांच्या नात्यातही तणाव असल्याचं समोर आलं आहे…मात्र याबाबत अजून काही स्पष्टता झालेली नाही… पण तणावाखाली सुशांतनं आत्महत्या केल्याची बाब मात्र स्पष्ट झाली आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button