breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus:दिल्लीत सहा दिवसानंतर कोरोना टेस्टिंग तिप्पट करणार : अमित शाह

नवी दिल्ली : दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदविस वाढत आहे. या पार्श्वभूनीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल बैजल यांच्यात बैठक झाली. केंद्र सरकार दिल्लीत कोरोनावर नियत्रंण मिळवण्यासाठी 500 रेल्वे कोचचे 8000 बेड देणार तसेच  दोन दिवसांत कोरोनाची चाचणी दोनपटीने वाढविण्यात येईल आणि 6 दिवसांनंतर ही चाचणी तीन पटीने केली जाणार आहे. असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या बैठकीत केजरीवाल, अमित शहा यांच्यासह दिल्लीच्या तिन्ही महापालिकांचे अध्यक्ष केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन उपस्थित होते.

अमित शहा यांनी ट्विटरवर माहिती दिली. अमित शहा म्हणाले की, दिल्लीत कोरोनाबाधित रूग्णांना बेड लवकर मिळावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने तातडीने दिल्लीला 500 रेल्वेचे डबे देण्याचा निर्णय घेतला आहे. या कोचमध्ये 8000 बेड असून सर्व सोयी सुविधा असणार आहे. दिल्लीच्या कंटेनमेंट झोनमध्ये कॉन्टॅक्ट मॅपिंग चांगल्याप्रकारे करण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्याचा अहवाल एका आठवड्यात येणार आहे. तसेच, रुग्णांचे मॉनिटरींग करण्यासाठी आरोग्य सेतु अॅप प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलमध्ये डाउनलोड केले जाणार आहे.

गृहमंत्री म्हणाले की, दिल्लीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांत कोरोनाची चाचणी दोनपटीने वाढविण्यात येईल आणि 6 दिवसांनंतर ही चाचणी तीन पटीने केली जाणार आहे. तसेच काही दिवसांनंतर कंटेन्मेंट झोनमधील प्रत्येक मतदान केंद्रावर चाचणी सुरू केली जाणार आहे. दिल्लीतील छोट्या रुग्णालयांना कोरोनाबद्दल योग्य माहिती आणि मार्गदर्शक सूचना देण्यासाठी मोदी सरकारने एम्स रुग्णालयाच टेलीफोनिक मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ डॉक्टरांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सर्वांना याचा फायदा होणार आहे. या हेल्पलाईनचा नंबर उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button