breaking-newsताज्या घडामोडीपुणे

Unlock Pune: पुणेकरांनो, हॉटेल-मॉलमध्ये जाताय? हे नियम वाचून घ्या

पुणे: पुण्यात लॉज, गेस्ट हाऊस, निवासी सुविधा असलेल्या हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर उद्यापासून (5 ऑगस्ट) हे व्यवसाय सुरु होतील. मात्र जेवणाची सुविधा देणाऱ्या रेस्टॉरंट मालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत पुणे मनपा प्रशासनाने मंगळवारी उशिरा नियमावली जाहीर केलेली आहे. पुण्यात लॉज, गेस्ट हाऊस, निवासी सुविधा, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करण्यात येणार आहेत. अटी आणि शर्तीनुसार पालिका प्रशासनाने उद्यापासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेर हे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे.

मॉलमध्ये मुलांसाठी खेळण्याची जागा आणि गेम परिसर पूर्णपणे बंद राहनार आहे. त्याचबरोबर मॉलमधील सिनेमागृह, फूड कोर्ट, रेस्टॉरंट नागरिकांसाठी बंद असणार आहेत. मात्र फूड कोर्ट, रेस्टॉरंटमधील तयार पदार्थांची घरपोच सेवा देता येणार आहेत.या नियमावलीनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील हॉटेल, लॉज, अतिथीगृह पूर्ण बंद राहतील, तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर हे व्यवसाय 33 टक्के क्षमतेने सुरु होतील. सर्व व्यावसायिकांनी दर्शनी भागात कोव्हिड सूचना फलक लावावेत. व्यावसायिकांनी हॉटेल पार्किंग आणि आवारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button