breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

राज ठाकरेंचा ‘सीएए’ ला जाहीर पाठिंबा…9 फेब्रुवारीला आझाद मैदानात सीएएच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा…

मुंबई | महाईन्यूज |

मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा सभागृहात मनसेची बैठक आयोजित करण्यात आली होती..केवळ दहा मिनिटात चर्चा आटोपून राज ठाकरे बैठकस्थळाहून निघाले. ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने ही बैठक घेतली होती. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच या बैठकीत मनसेतर्फे 9 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात सीएएच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली.

9 फेब्रुवारीला आयोजित केलेला मोर्चा यशस्वी झाला पाहिजे, अशा सूचनाही राज यांनी दिल्या आहेत.मनसेच्या अधिवेशनानंतर पक्षात नवी लाट आली आहे. अधिवेशनाच्या अधिवेशनात बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकता सुधार कायद्या’ जाहीरपणे समर्थन केले होते.

मनसेच्या बैठकीला बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अमेय खोपकर, अभिजीत पानसे यासारखे नेते उपस्थित होते. मनसेचे राज्यातील सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख उपस्थित होते.शिवसेनेत असतानाही राज ठाकरे यांची पाकिस्तानी आणि बांगलादेशी विरोधात हीच भूमिका होती. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे, अशी राज ठाकरेंची भूमिका असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे म्हणाले…

अचानक देशातच मोर्चा निघायला लागला, मुस्लिम रस्त्यावर उतरले. काहींनी मला सांगितले आहे की ते काश्मिर, राम मंदिरावर रागावले आहेत. त्याचा सामूहिक संताप आता ओतला जात आहे. जर ते बाहेरील मुसलमानांबरोबर उभे असतील तर आपण त्यांचे समर्थन का करावे? बरेचजण म्हणतात, राज ठाकरे यांनी आपला रंग बदलला का? पण माझा रंग तोच आहे. मी सरकार बदलत रंग बदलत नाही. राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाहीत.असेही ‘राज ठाकरे भाषणात म्हणाले…त्यामुळे आता मनसेच्या पक्ष रिलॉंचिंगनंतर राज ठाकरे यांनी CAAच्या विरोधात आपला मोर्चा वळवला..त्यामुळे 9 फेब्रुवारीला आयोजित केलेल्या आझाद मैदानातील या मोर्चाकडे सर्वांच लक्ष आहे…

'
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button