breaking-newsपुणेमहाराष्ट्र

राज्यात महिलांच्या सुविधांकडे दुर्लक्ष – सुप्रिया सुळे

पुणे: राज्यात महिलांच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ट्वीट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. राष्ट्रीय पाळणाघर योजनेतील पाळणाघरांचे अनुदान रोखल्यामुळे केंद्रातील सुमारे 3652 महिला कर्मचारी बेरोजगारीच्या वाटेवर आहेत.

दरम्यान, खासदार सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्वीट केले. त्या म्हणाल्या, राष्ट्रीय पाळणाघर योजनेतील 777 पाळणाघरांचे अनुदान सप्टेंबर 2017 पासून रोखण्यात आले आहे. स्त्री सक्षमीकरणात एक महत्त्वाचा टप्पा असणारी ही योजना शासनाच्या अनास्थेची बळी ठरली. महिलांच्या सुविधांकडे आपल्या राज्यात दुर्लक्ष होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button