breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

शाहरुख खानच्या ‘बेताल’ वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट या बॅनर अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘बेताल’ वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. स्वतः शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. वेब सीरिज पाहणाऱ्यांमध्ये हॉरर आणि थ्रिलर गोष्टी पाहण्याला अधिक पसंती दिली जाते. ही गोष्ट लक्षात घेऊन किंग खान प्रेक्षकांना गुंतवणून ठेवणारी गोष्ट घेऊन आला आहे.

बेताल ही एका अशा गावातली गोष्ट आहे जिथे दोन दशकांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचा कर्नल बेताल आपल्या झोम्बी फौजेला घेऊन परत येतो. कर्नलची बटालियन हळूहळू गावातील जनतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. पॅट्रिक ग्राहम यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं असून याआधी त्यांनी राधिका आपटेच्या ‘घुल’ वेबसीरिजचंही दिग्दर्शन केलं होतं. हा ट्रेलर पाहताना या सीरिजबद्दलची उत्सुकता अधिक वाढत जाते यात काही शंका नाही.

ट्रेलर शेअर करताना शाहरुखने लिहिले की, ‘तुम्ही राक्षसांसोबत युद्ध करायला किती दूर जाल? आमची दुसरी वेबसीरिज बेताल एक हॉरर आणि थ्रिलर गोष्ट आहे. २४ मे रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे.’बेतालमध्ये विनीत कुमार, अहाना कुमरा, सुचित्रा पिल्लई, जितेंद्र जोशी, मंजरी पुपला आणि सायना आनंद यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button