breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

‘कांतारा’ चा पुढील भाग होणार प्रदर्शित? रिषभ शेट्टीचा मोठा खुलासा

कांतारा चित्रपटाचा प्रीक्वल म्हणजेच भाग १ पुढील वर्षी येणार

Kantara : कांतारा या सिनेमाने गेल्या वर्षी एक वेगळाच इतिहास रचला. सुरूवातीला फक्त कन्नड भाषेतील प्रदर्शित झाला. यानंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टी रातोरात स्टार झाला. जानेवारी महिन्यात कांताराने चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण केले.

अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टी आणि होमबाले फिल्म्सचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी यानिमित्त जंगी सेलिब्रेशन केलं. यादरम्यान रिषभ शेट्टीने कांतारा २ बद्दल भाष्य केलं. कांतारा २ हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वल असणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तुम्ही आत्ता जे पाहिलं तो दुसरा भाग होता. या चित्रपटाचा प्रीक्वल म्हणजेच भाग १ पुढील वर्षी येणार आहे. कांताराचं चित्रीकरण करतानाच माझ्या डोक्यात याचा विचार आला होता, कारण या कथानकाचा इतिहास फार मोठा आहे. सध्या आम्ही या चित्रपटाच्या कथानकासाठी अधिक मेहनत घेत आहोत. आत्ता याबद्दल जास्त सांगता येणार नाही, असं रिषभ शेट्टी म्हणाला.

कांतारा हा फक्त १६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. पण या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात यश मिळवले होते. रिषभ शेट्टीच्या कांताराने बॅक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली. त्यामुळे आता कांतारा २ साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button