breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली – लॉकडाऊन काळात प्रचंड आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आता सिलिंडरसाठीही आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली असून घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६.५० रुपये जास्त मोजावे लागणार आहे.

वाचा :-भारतीय रेल्वेत 1 लाख 40 हजार जागांसाठी मेगाभरती

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आता १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांचा झाला असून कोलकात्यात तो ६७०.५० रुपये तर मुंबईत ६४४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरसाठी ६६० रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, आजची दरवाढ होण्याआधी दिल्लीत १४.२ किलो गॅस सिलिंडरचे दर ५९४ रुपये इतके होते. कोलकात्यात ६२०.५० रुपये, तर मुंबईमध्ये ५९४ रुपयांना गॅस सिलिंडर मिळायचा. मात्र आता यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याने सर्वासामान्यांच्या खिशाला या दरवाढीची झळ बसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button