breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या पार

  • मुंबईत १,१४२, पुणे शहरात १,६९५ नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने मंगळवारी आठ लाखांचा टप्पा ओलांडला. मंगळवारी राज्यभरात कोरोनाच्या १५ हजार ६७५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३२० जणांचा बळी गेला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ८ हजार ३०६ इतका झाला आहे. तर आतापर्यंत राज्यातील एकूण २४ हजार ९०३ जणांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, एका बाजूला रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तितकेच असणे, ही राज्याच्यादृष्टीने दिलासादायक गोष्ट आहे. आज दिवसभरात राज्यातील १० हजार ९७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे १ हजार १४२ नवे रुग्ण आढळले असून ३५ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १ हजार ५९६ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. यासह मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ९४७ इतकी झाली आहे. यापैकी १ लाख १८ हजार ८६४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ७ हजार ६९० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

राज्यात पुणे शहर हे कोरोनाबाधितांच्या संख्येत अग्रस्थानी आहे. पुणे शहरात काल दिवसभरात तब्बल १ हजार ६९५ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुण्याने दिल्ली, मुंबई या दोन्ही शहरांना मागे टाकले आहे. याचबरोबर पुण्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९७ हजार ६८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २ हजार ३३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ४१९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. यासह पुणे शहरात एकूण ७९ हजार ४८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button