breaking-newsपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे तापकीरनगर, ज्योतिबानगर ‘खड्ड्यात’ !

  • विकास कामांच्या बाबतीत ठेकेदाराची मनमाणी
  • माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा आयुक्तांवर संताप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

ड्रेनेज लाईन आणि पाणी पुरवठा नलीका भूमिगत करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे काळेवाडी, तापकीरनगर, ज्योतिबानगर भागात राहणा-या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामाचे योग्य नियोजन करण्याचे आदेश संबंधीत ठेकेदारांना देण्यात यावेत, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचा इशारा माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.

यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नमूद केले आहे की, काळेवाडी, तापकीरनगर, ज्योतिबानगर भागात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ड्रेनेजलाईन आणि पाणी पुरवठा लाईन भूमिगत करण्यासाठी खोदाई केली आहे. परंतु, गेली कित्येक दिवसांपासून हे काम पूर्ण केले गेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना तसेच वाहतुकीला याचा सामना करावा लागत आहे.

महापालिकेने केलेल्या खोदाईमुळे भूमीगत विद्युत प्रवाहाच्या केबल तुटल्या आहेत. यासंदर्भात महावितरण विभागाकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेकडे बोट दाखविले जात आहे. पालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधीत ठेकेदाराला योग्य उपाययोजना करण्याची सूचना देण्यात यावी, अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल, असा इशारा तापकीर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button