breaking-newsराष्ट्रिय

जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये जीएसटी वसुलीत आणखी घट

  • अवघे ८६,४४९ कोटींचे उत्पन्न

नवी दिल्ली – यंदा जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये जीएसटी वसुलीत घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जुलैमध्ये ८७,४२२ कोटी जीएसटी मिळाला होता. मात्र ऑगस्टमध्ये त्यात घट होऊन ८६,४४९ कोटी एवढे जीएसटीचे उत्पन्न मिळाले आहे. ऑगस्टमधील मध्यवर्ती जीएसटी वसुलीतही घट झाली असून जुलैमध्ये ही वसुली १६,१४७ कोटी होती, ती ऑगस्टमध्ये १५,९०६ कोटीपर्यंत घसरली आहे.

राज्य जीएसटीच्या उत्पन्नातही अशीच घट झाली आहे. जुलैमध्ये हे उत्पन्न २१,४१८ कोटी होते. ते ऑगस्टमध्ये २१ हजार ६४ कोटी झाले आहे. ऑगस्टमध्ये इंटिग्रेटेड जीएसटीतही घट झाली आहे. जुलैमध्ये हे उत्पन्न ४२,५९२ कोटी होते. ते ऑगस्टमध्ये ४२,२६४ कोटी झाले आहे. जीएसटीच्या सेस वसुलीतही ऑगस्टमध्ये घट झाली आहे. जुलैमध्ये हे उत्पन्न ७,२६५ कोटी होते. ऑगस्टमध्ये ते ७,२१५ कोटी झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये केवळ ८८ टक्के जीएसटी वसुली झाली असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ९८,२०२ कोटी एवढे जीएसटीचे उत्पन्न मिळाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button