breaking-newsमुंबई

नालासोपाऱ्यात चार मजली इमारत कोसळली

नालासोपारा – महाड इमारत दुर्घटना ताजी असतानाच आज मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास नालासोपाऱ्यात चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत रहिवाशांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रहिवाशांचे घर-संसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत. सध्या अग्निशमन दल आणि तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल आहेत.

नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरात ‘साफल्य’ ही चार मजली इमारत होती. २००९ साली ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. केवळ ११ वर्ष जुनी असलेली ही इमारत कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत एकूण २० फ्लॅट होते. परंतु इमारत धोकादायक झाल्याने महापालिकेने रहिवाशांना इथून बाहेर पडण्याची नोटीस दिली होती. त्यानुसार १५ कुटुंब अगोदरच दुसरीकडे राहण्यास गेली होती. परंतु ५ कुटुंब या ठिकाणीच वास्तव्यास होती. काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या काही भिंतींची माती पडू लागल्याने सर्व रहिवाशांमध्ये धाकधूक होती. अखेर १२च्या सुमारास सर्व रहिवासी इमारतीच्या खाली आले. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता काही क्षणातच चार मजली इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली. दरम्यान, इमारतीत राहणारी पाचही कुटुंब वेळीच बाहेर पडल्याने सुखरुप आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button