breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ९५ हजार ८६५ वर

  • मुंबईत १,०१०, पुण्यात २,८०० नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सतत वाढणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. रविवारी दिवसभरात राज्यात 11 हजार 111 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर 288 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तसेच दिवसभरात 8 हजार 837 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 6 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. सध्या राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 95 हजार 865 इतका झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत 4 लाख 17 हजार 123 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक बाब आहे. तर सध्या 1 लाख 58 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू असून 20 हजार 37 जण दगावले आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात १ हजार १० नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख २८ हजार ७२६ वर पोहोचली आहे. तसेच काल दिवसभरात ७१९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून मुंबईतील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता १ लाख ३ हजार ४६८ इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा सव्वा लाखाच्या, तर कोरोनाबळींचा आकडा तीन हजारांच्या पुढे गेला आहे. रविवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात एकूण २ हजार ८०० नवे कोरोना रुग्ण आढळले. यापैकी पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ५२२ रुग्ण आहेत. दरम्यान, केवळ रविवारी दिवसभरात जिल्ह्यात २ हजार ३०० रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ९५ हजार ८३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button