breaking-newsताज्या घडामोडीलेखव्यापार

कोकणातील गृहिणी बनली मसाला क्वीन

गृहिणी ते शिवम मसाल्याची उद्योजिका; वाचा वैशाली घाडीगावकर यांचा रोमहर्षक प्रवास

सिंधुदुर्ग : यशस्वी उद्योजक कोणाला म्हणावे? ज्याच्याकडे व्यवसायाची संधी ओळखण्याची, जोखीम पत्करण्याची आणि आपल्याप्रमाणेच अनेकांनाही रोजगार देतात. सिंधुदुर्गला एका छोट्या गावात राहणाऱ्या वैशाली घाडीगावकर या उद्योजक बनू इ्च्छिणाऱ्या अनेक महिलांसाठी आदर्श निर्माण करत आहेत.

वैशाली घाडीगावकरांचे तसे चौकोनी कुटुंब. ते त्यांचे पती, मुलगा आणि सासूसह मालवण येतील नांदोसे या छोट्याश्या गावी राहतात. वैशाली यांचा मुलगा सध्या बारावीत शिकतो आहे. नुसते घरी बसून राहणे त्यांना पटणारे नव्हते. स्वयंपाकाची वैशालींना तशी विशेष आवड. स्वयंपाकाला भाजीसाठी लागणारे वाटण तसेच मसाले त्या घरीच करायच्या. घरी येणारे नातेवाईक तसेच मैत्रिणींनी त्यांच्या या कौशल्याची तारीफ केली. याचवेळेस वैशाली यांना घरच्यांनी युवा परिवर्तनच्या मसाले बनवण्याच्या कोर्सविषयी सांगितले. तेथे त्यांनी मसाला बनवायचे २७ प्रकार शिकून घेतले.

यानंतर वैशाली घाडीगावकर यांनी मसाले बनवण्यासाठी आवश्यक अशी सामग्री घेतली. आता त्यांनी शिवम मसाले नावाचा उद्योग सुरु केला आहे. कुटुंबाच्या सहकार्याने त्या सहा प्रकारच्या मसाल्यांची विक्री करतात. गावात त्यांनी आपले छोटेसे दुकानही थाटले आहे. आता त्यामुळे वैशाली घाडीगावकर दर महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमावतात. गावातील पाच मुलींना आज शिवम मसाल्यामुळे रोजगार मिळाला आहे. ”मी आधी घरच्या घरी मसाले बनवायचे. आता माझ्या आवडीचे रुपांतर उद्योगात झाले आहे. यामुळे मी आता कुटुंबालाही आर्थिकरित्या मदत करु शकते आणि गावातील माझ्यासारख्या गृहिणींना सुध्दा स्वावलंबी बनवले असल्याचे वैशाली घाडीगावकर सांगतात.

आपल्या मेहनतीच्या आणि स्वबळावर एक गृहिणी ते शिवम मसाल्याच्या यशस्वी उद्योजक हा वैशाली घाडीगावकरांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button