breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

पुणे ,साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे – पुणे आणि साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे आणि साताऱ्याशिवाय मुंबई, रायगड आणि पालघरमध्येही आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागातील एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पुणे, कोल्हापूर, सतारा आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात सोमवारपासून मुसळधार पावासाचा अंदाज आहे. सातारा आणि पुण्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.’

दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे भरली असून त्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगलीत कृष्णेच्या वाढत्या पातळीमुळे अनेक गावांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे चिपळूण, राजापूरमध्ये पूरस्थिती असून वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button