breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#JammuKashmir: पुलावमत सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळला

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील काही प्रांतांमधून दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नांना वेग आला असला तरीही दहशतवादी कारवाया मात्र दर दिवशी एक नवं आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर उभं करत आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्टच्या रात्री जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील तुजन या गावानजीक एका पुलाखाली Improvised Explosive Device (IED) स्फोटकं लावल्याचं निदर्शनास आलं होते. ज्याची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी त्याचा शोध घेतला आणि मोठा घातपात टळलेला आहे. 

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून तुजन आणि दलवान या गावांजवळील रस्त्यावरील एका पुलाखाली ही स्फोटकं घातपाताच्या उद्देशानं ठेवण्यात आलेली होती.  सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळं या भागात मोठा हल्ला होताहोता टळलेला आहे. मुख्य म्हणजे पुलवामा आणि बडगाम या भागांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावरुन अनेकद्या सैन्य आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या वाहनांचीही ये-जा होत असते. त्यामुळं एक मोठं संकट टळलं अशी माहिती समोर येत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button