breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. वय 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, दुपारी 12 वाजता पुण्यातील वैकुंठमध्ये होणार अंत्यसंस्कार होणार आहेत. चल रे लक्ष्या मुंबईला, खट्याळ सासू नाठाळ सून, खरं कधी बोलू नये, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, रंगत संगत, थरथराट इत्यादी चित्रपटातून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत जयराम कुलकर्णी यांनी पोलिसांच्या भूमिका साकारल्या. डॉ. हेमा कुलकर्णी जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत. तर त्यांचा मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. मृणाल देव-कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून होत.

जयराम कुलकर्णी यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे गाव आहे. जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका त्यांना साकारायला मिळाली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच. जयराम कुलकर्णी असा शिक्का त्यांच्यावर बसला. कॉलेज शिक्षणानंतर 1956 साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी लागली. नाटकात कामे करण्याची हौस असल्याने 1970 साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्याने नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे आकाशवाणीच्या नोकरी

आकाशवाणीत नोकरी करत असताना व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या बरोबरच  ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मा. मिरासदार, आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी आकाशवाणीच्या नोकरीमध्ये संबंध आला व अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली. याचाच फायदा चित्रपटात काम करताना उपयोगी पडला. चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम कुलकर्णी या समीकरणानेच प्रत्येक जण माझ्याकडे पाहू लागला. सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका त्यांनी चित्रपटांतून केल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकाही त्यांच्या गाजल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button