breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

राजघराण्याच्या वारसाने जाहीर केला शाही पद सोडण्याचा निर्णय

लंडन | ब्रिटनच्या शाही कुटुंबातील प्रिन्स चार्ल्सच्या यांच्या छोट्या मुलानं हॅरीने शाही पदाच्या रुपात रॉयल कुटुंबातील वरिष्ठ सदस्यात्व सोडण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच, पत्नी मेगन मार्केल हिच्यासोबत आपण आर्थिक स्वरुपात स्वतंत्र होण्याचा विचार करत असल्याचे हॅरीने स्पष्ट केले आहे.

अनेक महिने विचार केल्यानंतर आपण या निर्णयावर पोहचण्याचा आणि यावर्षीचा हा संकल्प केल्याचे या दाम्पत्याने म्हटले. सद्य व्यवस्थेत आपल्यासाठी प्रगतीशील भूमिका शोधण्यासाठी उत्सुक आहे. रॉयल कुटुंबात आपल्याला मिळालेलं पद सोडून स्वत:ला आर्थिककरित्या स्वावलंबी बनवण्याच्या दिशेनं आपण पुढे वाटचाल करत असल्याचं प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केलनं म्हटलंय. परंतु, सोबतच आपण ब्रिटिश महाराणीचं सहकार्य अगोदरप्रमाणे करत राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केले. प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगल मार्केलजवळ ‘डचेस ऑफ ससेक्स’चा खिताब आहे. या दाम्पत्याने ब्रिटन आणि अमेरिकेत आपलं आयुष्य व्यतीत करणार असल्याचेही म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button