breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मदत नव्हे कर्तव्य…उपक्रमाचा लाभ मावळातील दुर्गम भागात पोहोचला; आमदार सुनील शेळके यांचा मनोदय पूर्ण झाला!

– दुर्गम भागातील आदिवासी वस्तींवर जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

तळेगाव दाभाडे ।महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील एकही कुटुंब उपाशी राहणार नाही, असा मनोदय आमदार सुनील शेळके यांनी केला होता. आता मावळातील अगदी दुर्गम भागात असलेल्या आदिवासी पाड्यांवरही जीवनाश्यक वस्तुंची किट पोहोचली आहे.

          आमदार सुनील शेळके मित्र परिवार आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील गोवित्री या ठिकाणी आदिवासी वस्तीवर जाऊन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात  आले.  यावेळी माजी सभापती गणपत शेडगे, ग्रामपंचायत सदस्य अरुण आढाव, सुदाम कदम, अमोल पवार, प्रवीण शेडगे, चेअरमन नारायण आढाव, बाळू शिंदे, नारायण मालपोटे, सुरेश आढाव, राहुल मोहिते, अतुल आढाव श्रीपत गायकवाड, रमेश भुरुक, बाजीराव शिंदे, दत्ता जाधव, रोहिदास सोनवणे, यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते.

          तसेच, नवनाथ पवार, निलेश जाधव, सुनील आढाव, दत्ता लोखंडे, विनायक जाधव, दीपक सुतार, गणेश ठाकर, विनायक जाधव, सागर सावंत, शाम शिंदे, राजू गरुड, नवनाथ केदारी, रामदास केदारी, योगेश केदारी, पंकज आढाव, मयुर नाटक यांनी जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला.

          कोरोनाच्या संकटकाळात कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये यासाठी ‘मदत नव्हॆ कर्तव्य ‘ या उपक्रमांतर्गत गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचा संच घरपोच देण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. शक्य तितक्या गरजु कुटुंबांपर्यंत हे साहित्य पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे.  शहर आणि परिसरात गरजूंना मदत मिळत असताना डोंगराळ, दुर्गम भागात राहणारी आदिवासी कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही गरज ओळखून गोवित्री आणि परिसरातील गरजु कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button