breaking-newsक्रिडापुणेमहाराष्ट्र

पुण्याच्या सृष्टी शेलारला टेबल टेनिसमध्ये सुवर्ण

पुणे: चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय केंद्रीय विद्यालय खेल कूद स्पर्धेअंतर्गत शालेय टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याची गुणवान युवा खेळाडू सृष्टी शेलारने सुवर्णपदक संपादन करून चमकदार कामगिरी केली.

सृष्टी शेलार ही केंद्रीय विद्यालय, गणेशखिंड, औंध या शाळेची विद्यार्थिनी असून ती भाऊसाहेब वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक संजय भूखन यांनीही तिला मार्गदर्शन केले. राष्टीय खेल कूद स्पर्धेत सृष्टीने पुणे विभाग व गणेशखिंड केंद्रीय विद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. त्याआधी पुणे विभागाची सृष्टी शेलार आणि मुंबईची टेबल टेनिसपटू अंकिता सिंग या दोघींचीच राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली होती.

सृष्टीने टेबल टेनिसमधील 19 वर्षांखालील गटांत मुलींच्या दुहेरीत सुवर्णपदक पटकावून चेन्नईत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली. या सुवर्णपदकामुळे सृष्टी शेलार व अंकिता सिंग यांची अखिल भारतीय स्तरावरील एसजीएफआय क्रीडास्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रीय केंद्रीय विज्यालय स्पर्देतील यशाबद्दल सृष्टीचे सर्व स्तरांवरून अभिनंदन करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button