breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

‘या’ औषधांमुळे कोरोनावर उपचार होण्याची शक्यता

सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर लस किंवा औषध शोधण्याच काम अगदी युद्ध पातळीवर सुरु आहे. देशातील शास्त्रज्ञ आणि औषध बनवणाऱ्या कंपन्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत. औषध तयार करणारी कंपनी सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज यापैकीच एक आहे. ही कंपनी झाडांवरील औषधांची एक्यूसीएच आधारित निर्मीती करते. या औषधांमुळे कोरोनावर उपचार होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.  कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधाची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे. 

सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार  कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी झाडांपासून तयार झालेल्या औषधांवर एक्यूसीएचे परिणाम दिसून आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात आलं आहे. या औषधाच्या निर्मितीसाठी FDA कडून परवानगी देण्यात आली आहे.  झाडांमध्ये असलेल्या औषधी गुणांवर आधारीत हे औषधं तयार करण्यात येणार आहेत. 

या औषधाचे १२ केंद्रांवर २१० रुग्णांवर परिक्षण केले जाणार आहे. यात रुग्णांना १० दिवसांसाठी निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार आहे. या लसीचे क्लिनिकल रिजल्ट ऑक्टोबरपर्यंत येण्याची शक्यता  असल्याचं तज्ज्ञांचं म्हणन आहे .  एक्यूसीएचा विकास डेंग्यूच्या आजारासाठी केला जातो. यामध्ये विषाणूंना निष्क्रिय करण्याची क्षमता असते. म्हणून कोरोनासाठी सुद्धा या औषधाचा वापर केला जाणार आहे. 

एक्यूसीएच मानवी शरीरासाठी कितपत सुरक्षित आहे. याबाबतचे संशोधन पूर्ण झाले असून आता हे औषध दुसऱ्या टप्प्यात आहे. जर क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध विषाणूंना नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरले तर कोरोनावरचा जालीम उपाय नक्कीच ठरू शकत. काही दिवसांपूर्वी कोरोनाचे उपचार शोधण्यासाठी स्पेनमध्ये सुद्धा संशोधकांनी ६ हजारांपेक्षा जास्त औषधांवर परिक्षण केलं होतं. 

त्यामुळे आता शोधात आलेलं हे नविन औषध कोरनासाठी किती जालीम ठरतय हे पहाण मात्र महत्त्वाच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button