breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

30 जूनपर्यंत महत्त्वाची 7 कामं पूर्ण होणे महत्त्वाचे

सध्या देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.त्याचबरोबर काही कायदे- नियमही लागू करण्यात आले आहेत..मात्र आता काही प्रमाणात आता हे नियम आणि अटी शिथीलही करण्यात आल्या आहेत… 

लॉकडाऊनमध्ये आर्थिक व्यवहार आणि बँक-आधार आणि इतर व्यवहारांसंबधित कामांसाठी केंद्र सरकारकडून नागरिकांना मुदत वाढवून देण्यात आली होती. केंद्र सरकारनं बँकेशी संबंधित असलेल्या व्यवहारांच्या काही अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत. 30 जूनपर्यंत महत्त्वाची 7 कामं पूर्ण न केल्यास मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे .

पाहुयात ती कोणती 7 महत्त्वाची काम आहेत ते…

1. आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्चवरून आता 30 जून करण्यात आली आहे. त्यामुळे आधार-पॅन लिंक करणं गरजेचं आहे. आधार-पॅन लिंक न केल्यास कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

2. 2019-2020 आर्थिक वर्षामध्ये कर वाचवण्यासाठी बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली नसेल तर ती 30 जूनपर्यंत करता येईल.

30 मार्च 2020 पर्यंत ही मुदत देण्यात आली होती मात्र आता ती वाढवून 30 जून करण्यात आली आहे. 30 जून पर्यंत 80C आणि 80D अंतर्गत करामध्ये सूट देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

3. 2018-2019 आर्थिक वर्षातील ज्या व्यक्तींनी ITR अद्यापही भरला नाही त्यांच्यासाठी 30 जूनपर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.

4. सरकारने काढलेल्या अध्यादेशाद्वारे फॉर्म -16 म्हणजे पगारापासून वजा केलेल्या टीडीएसचे प्रमाणपत्र जारी करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. फॉर्म नंबर 16 च्या मदतीने ITR दाखल करता येतं. तसेच पगार आणि इतर संबंधित गोष्टींची माहिती मिळते.

5. जर  किमान वार्षिक ठेव किंवा कोणतेही लहान बचत योजना खाते किंवा पीपीएफ खाते उघडले असेल तर शेवटच्या तारखेला रक्कम न भरल्यास आता दंड भरावा लागू शकतो.सध्या पीपीएफ व सुकन्या समृद्धी योजना खात्यात किमान रक्कम जमा नसल्यास दंड आकारण्यात येत आहे. एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे जमा करण्याचे राहिले असतील तर ते 30 जूनपर्यंत खात्यात जमा करावे लागणार आहे.

6. तुमचं पीएफ अकाऊंट मॅच्युअर झालं असेल आणि तुम्ही त्याची मुदत वाढवणार असाल आणि अद्यापही वाढवली नसेल तर ही मुदत 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे.मुदत वाढवल्याचा फॉर्म जमा करण्याची अंतिम मुदत 30 जून असणार आहे. पोस्टाने याबाबत माहिती दिली आहे.

7. सरकारने ज्येष्ठ नागरिक योजनेच्या खात्यात गुंतवणूक करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या गुंतवणुकीची अंतिम तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढविली आहे.

तर, ही आहेत ती म्हत्त्वाची 7 कामे जी 3 जूनच्या आधी पूर्ण करणे गरजेचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button