breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी पालिकेतील आर्थिक टक्केवारीचे नागपूर “कनेक्शन”, तर भाजप नेत्यांची “टेंडर”मध्ये “स्लीपींग पार्टनर्शीप”

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा पत्रकार परिषदेत आरोप

पिंपरी – नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशांतून पिंपरी-चिंचवडचा विकास साधण्यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर हे नागपूर येथून ठेकेदार पिंपरीत आणत आहेत. या ठेकेदारांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत टक्केवारीची गणिते आखली जात आहेत. पिंपरीतल्या नागरिकांच्या कराचे पैसे थेट नागपूरमध्ये पोहोच करणारे आयुक्त हे मुख्यमंत्र्यांचे दूत आहेत काय?, असा सवाल विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केला. तर, स्थानिक आमदार, खासदार, पदाधिका-यांना शांत बसवण्यासाठी काही टेंडरमध्ये त्यांची स्लिपींग पार्टनर्शीप देखील देण्यात आली आहे, असा सडेतोड आरोपही साने यांनी भाजपच्या नेत्यांवर केला.

 

राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सेल्फी विथ खड्डा’ हा उपक्रम सुरु केला आहे. शहरातील रस्त्यावरील खड्ड्याचे फोटो  विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या (9822199599) आणि युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या (9970037513) या व्हॉटसअॅपवर पाठविण्याचे आवाहन साने यांनी केले. फोटो पाठविणा-याला प्रत्येक खड्ड्यासाठी 100 रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती साने यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. 17) दिली. यावेळी खड्ड्यांवरून त्यांनी आयुक्त आणि भाजप पदाधिका-यांवर सडेतोड आरोप केले.

 

यावेळी साने यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यावर सुध्दा जोरदार फटकेबाजी केली. आयुक्त गांभिर्याने घेत नसल्यामुळे त्यांच्या आदेशाला अधिकारी मुठमाती देत आहेत. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, आमदारांच्या दबावाला बळी पडून प्रशासन चालवित असल्यामुळे त्यांच्या कार्यपध्दतीवर संशय निर्माण झाला आहे. आता तर पिंपरीतील विकास कामांसाठी आयुक्त नागपूर येथून ठेकेदार आणत आहेत. या ठेकेदारांच्या माध्यमातून थेट टक्केवारी मुख्यमंत्र्यांपर्यंत जात आहे की काय? असा संशय निर्माण झाल्याची भावना साने यांनी व्यक्त केली.

 

पत्रकार परिषदेत युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी युवक अध्यक्ष मयुर कलाटे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button