breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत 8 जूनपासून बेस्ट सेवाही नियमित सुरू

‘मिशन बिगिन अगेन’च्या तिसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त ८ जूनपासून बेस्ट सेवाही मुंबईत नियमित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय आणि खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांबरोबरच मुंबई उपनगरातील प्रवाशांनाही यातून प्रवास करता येणारे. याशिवाय सरकारी कार्यालयातील वाढवण्यात आलेल्या उपस्थितीनंतर एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक अतिरिक्त २५० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रातही एसटी धावतील.

बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, बसमधील प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसण्याची परवानगी असेल. तर पाच प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील. सध्या बेस्टकडून मंत्रालय, डॉक्टर, परिचारिका, पोलीस इत्यादींसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून १,५०० ते १,६०० बसेस धावतात. मात्र सोमवारपासून सेवा सुरू करताना हीच संख्या सुरुवातीला २,३०० पर्यंत आणि त्यानंतर हळूहळू ३,५०० पर्यंत नेण्याचा प्रयत्न बेस्ट उपक्रमाचा असेल.

मंत्रालय आणि अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून १५ टक्के तर खासगी कार्यालयांमध्ये १० टक्के  उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटीनेही अतिरिक्त २५० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बस पनवेल, पालघर आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून धावणार आहेत. २५० पैकी १४२ बसेस विशेषत: मंत्रालय, १५ बस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत. उर्वरित बसेस मुंबई महानगर प्रदेशांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे कर्मचारी आणि खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरिताही धावतील.  बसमध्ये प्रवेश देताना वाहकाकडून कर्मचारी किंवा अन्य प्रवाशांचे ओळखपत्र विचारण्यात येणार असल्याचं असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकु मार बागडे यांनी सांगितले.

एसटी महामंडळाने बसगाडय़ांमध्ये उभ्याने प्रवासी न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे; मात्र सोमवारपासून बेस्ट धावताना यामध्ये पाच प्रवासी उभ्याने घेण्यात येणार आहेत. यामुळे सामाजिक अंतर राखले जाणार नसून परिणामी करोनाचा फैलावाचा धोका कायम राहील. यात बेस्टचे नियोजन योग्य नसून उभ्याने प्रवासी घेऊ नये, अशी मागणी  बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button