breaking-newsमुंबई

म्हाडाकडून शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला पाच कोटीची दोन घरे !

मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत शिवसेनेच्या एका शाखाप्रमुखाला ख-या अर्थाने लॉटरी लागली आहे. शिवसेनेच्या विनोद शिर्के यांनी ग्रँट रोड येथील ५ कोटी किंमत असलेल्या दोन घरांसाठी अर्ज केला होता. या दोन्ही ठिकाणी विनोद विजेते ठरले आहेत. तर शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परळ येथील ९९ लाखांचे घर लागले आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे १ हजार ३८४ घरांची सोडत रविवारी काढण्यात आली. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात ही सोडत काढण्यात आली. यंदाच्या सोडतीत मुख्य आकर्षण ठरले ते उच्च उत्पन्न गटातील ५ कोटींची घरे. म्हाडाच्या सोडतीच्या इतिहासात प्रथमच ५ कोटी किंमत असलेल्या घरांचा समावेश आहे. त्यामुळे ही कोट्यवधींची घरे कुणाचा पदरात पडतील? याची उत्सुकता प्रत्येकाला लागून होती.

शिवसेनेच्या विनोद शिर्के यांनी ५ कोटी ८० लाख आणि ४ कोटी ९९ लाखांच्या घरांसाठी अर्ज केला होता. ही दोन्ही घरे ग्रँट रोड येथील असून या दोन्ही ठिकाणी विनोद विजेते ठरले. म्हाडाच्या नियमानुसार एका अर्जदाराला दोन घरे लागली तर एक घर म्हाडाला परत करावे लागते. त्यामुळे विनोद यांना या दोन्ही घरांपैकी एक घर म्हाडाला परत करावे लागणार आहे. विनोद गेल्या १५ वर्षांपासून म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button