breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या 6 वीर जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर…

देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीर जवानांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात विविध मोहिमांमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या सहा जवानांना शौर्य पुरस्कार दिले जाणार आहेत…

लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ओराओन यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे. लामा यांनी मणिपूर येथे आपलं इंटेलिजन्स नेटवर्क बळकत करून १४ दहशतवाद्यांना हेरलं.


मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह

मणिपूरच्या जंगलात झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

नायब सुभेदार नरेंद्र सिंह

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या कारवाईबद्दल नायब सुभेदार नरेंद्र सिंह यांचा शौर्य पुरस्काराने गौरव

नायब सुभेदार सोमबीर

राष्ट्रीय रायफल्समधील नायब सुभेदार सोमबीर यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

नाईक नरेश कुमार

जम्मू-काश्मीरमधील एका गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधमोहिमेत हुडकून ठार केलं. या मोहिमेत दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला होता.

शिपाई करमदेव ओराओन

नियंत्रण रेषेवर ओराओन लाइट मशीन गनर म्हणून तैनात होते. २९ डिसेंबर २०१८ ला सायंकाळी शत्रूकडून बेछूट गोळीबारास सुरूवात झाली. चार दहशतवादी समोरून गोळीबार करत होते. ओराओन यांनी मशीन गनने दहशतवाद्यांना गुंतवून ठेवले. बंकरमध्ये जाऊन त्यांनी नऊ ग्रेनेड फेकले आणि दोन दहतवाद्यांचा खात्मा केला होता…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button