breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्या वेळात घेणार आमदारकीची शपथ

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर आठ आमदार आज (१८ मे) दुपारी १ वाजता शपथ घेणार आहेत. यात काँग्रेसचे राजेश राठोड, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे तर भाजपकडून रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतील.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिनांक होता. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी १२ मे रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button