breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना इंटरनेट सेवा मोफत देण्याची केलेली घोषणा खरी की खोटी ?

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्व मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना इंटरनेट सेवा मोफत देण्याची घोषणा केली असल्याची बातमी आली होती… मात्र ही बातमी साफ खोटी असून कोणत्याही मोबाईल कंपनीने कोणत्याही ग्राहकांसाठी अशी ऑफर दिलेली नाही. त्याबाबत कोणती अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाहीये… त्यामुळे सोशल मीडिया अथवा इतर कोणत्या माध्यमतून पसरलेल्या या बातमीवर विश्वास ठेऊ नका. मोफत इंटरनेट सेवेबाबतच्या वृत्ताचे दूरसंचार विभागाने खंडण केल्याची माहिती पीआयबीने दिली आहे.

पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दूरसंचार विभागाचा हवाला देत फॅक्ट चेक पोस्ट केली आहे. या पो्स्टमध्ये कोणत्याही कंपनीने असी कोणताही ऑफर दिली नाही. त्यामुळे स्वत:ची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या. पीआयबीच्या ट्विटमध्ये एक इमेजही देण्यात आली आहे. या इमेजमध्ये मोफत इंटरनेटचे वृत्त कशा पद्धतीने देण्यात आले आहे, याबाबत सांगितले आहे. तसेच, एक लिंकही दिली आहे. ज्यावरुन हा खोटे वृत्त पसरविण्यात आले. धक्कादायक असे की, या दिशाभूल करणाऱ्या मेसेजमध्ये ही ऑफर केवळ 17 मे 2020 पर्यंत असल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, सोशल मीडिया अथवा इतर कोणत्याही माध्यमातून अफवा, पसरणे, दिशाभूल करणारे मेसेज पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत न्यायालयाने स्पष्ट सूचनाही दिल्या आहेत की, कोरोना व्हायरसबाबत कोणत्याही प्रकारे दिशाभूल करु नये. गांभीर्य ओळखून अफवा पसरवण्यापासून दूर राहावे. असे असूनही अनेक समाजकंटक नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता स्वत:ची फसवणूक टाळायला हवी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button