breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ममता बॅनर्जींची उमेदवारी रद्द करा, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बंगालमधील निवडणुकांमध्ये नंदीग्राम मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुवेंदु अधिकारी असा सामना रंगताना दिसत आहे. यातच आता ममता बॅनर्जींनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवल्याने उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

उमेदवारी अर्जात त्यांच्याविरुद्धची 6 गुन्हेगारी प्रकरणे जाहीर न केल्यामुळे ममता बॅनर्जींचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात यावा अशी मागणी शुवेंदु अधिकारी यांनी केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्याविरोधात 6 गंभीर गुन्हे प्रलंबित आहेत. त्यातील 5 आसाममध्ये तर 1 सीबीआयच्या अधीन आहे. मात्र त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्याचा उल्लेख केलेला नाही, असे अधिकारी यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

त्यांनी गुन्ह्यांची माहिती लपवली असून, त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारावा, असे आवाहन मी निवडणूक आयोगाला केले आहे. याबाबत ते योग्य ती कारवाई करतील अशी मला आशा असून मी त्यासाठी वाट पाहीन. ही कारवाई कायद्यानुसार व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button