breaking-newsपिंपरी / चिंचवड

Covid 19 आणि विकास कामांच्या नावाखाली ९ कोटींचे उड्डाण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना कोविड १९ या प्रादुर्भाव नियंत्रणच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ब्याक्टोडेक्स हे जंतूंनाशक खरेदी करणेकामी येणान्या १ कोटी ३७ लाख इतक्या खर्चास तसेच महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासाठी २ नग सोनोग्राफी कलर डापलर उपकरण खरेदीसाठी येणान्या ८८ लाख ६७ हजार खर्चासह शहरात करण्यात येणा-या – इतर विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण ९ कोटी १ लाख इतक्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

आज झालेल्या या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. चिखली येथील नेवाळेवस्ती पंप हाऊस परिसरात जल : निस्सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ६२ लाख ३३ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग २८ मधील विश्वशांति कॉलनी, गावठाण परिसर, शिवराजनगर, रहाटणी इतर परिसरात जल : निस्सारण विषयक सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या ४५ लाख ७५ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. कोरोना कोविड १९ या वायरस चा प्रादुर्भाव नियंत्रणच्या कारणास्तव निविदा विषयक कामास होणारा कालापव्ययाचा विचार करता मनपाच्या थेरगाव गावठाण, थेरगाव स . न . ९ थेरगाव लक्ष्मणनगर, काळाखडक वाकड, काळाखडक बुस्टरपंप व पुनावळे येथील पंप हाऊसचे चालन करणे या कामास दि . ०१ / ०५ / २०२० पासून दि . ३१ / १० / २०२० पर्यंत सहा महिन्याकरिता मुदतवाढ मिळणे व त्या कालावधीतील अदा करावयाच्या पंप चालानाचा खर्च ३३ लाख ९ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

कोरोना कोविड १९ या वायरस चा प्रादुर्भाव नियंत्रणच्या कारणास्तव निविदा विषयक कामास होणारा कालापव्ययाचा विचार करता मनपाच्या सांगवी गावठाण, सांगवी पीडब्लुडी सांगवी, स. न. ८४, पिंपळे गुरव व दापोडी येथील शुद्ध पाणीपुरवठा करणान्या पंप हाऊसचे चालन करणे या कामास दि . ०१ / ०५ / २०२० पासून दि . ३१ / १० / २०२० पर्यत सहा महिन्याकरिता मुदतवाढ मिळणे व त्या कालावधीतील अदा करावयाच्या पंप चालानाचा ३२ लाख ८७ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. कोरोना कोविड १९ या वायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणच्या कारणास्तव निविदा विषयक कामास होणारा कालापव्ययाचा विचार करता मनपाच्या कृष्णानगर, स . न . २२, पाटीलनगर, जाधववाडी, से. न. १० व गवळीमाथा येथील पंप हाऊसचे चालन करणे या कामास दि . ०१ / ०५ / २०२० पासून दि . ३१ / १० / २०२० पर्यंत सहा महिन्याकरिता मुदतवाढ मिळणे व त्या कालावधीतील अदा करावयाच्या पंप चालनाचा खर्च ३१ लाख ९६ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

कोरोना कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणच्या कारणास्तव निविदा विषयक कामास होणारा कालापव्ययाचा विचार करता मनपाच्या रहाटणी, स . न . ९६, लांडेवाडी, दिघी, चरोली व बोपखेल येथील पंप हाऊसचे चालन करणे या कामास दि . ०१ / ०५ / २०२० पासून दि. ३१ / १० / २०२० पर्यंत सहा महिन्याकरिता मुदतवाढ मिळणे व त्या कालावधीतील अदा करावयाच्या पंप चालानाचा खर्च २६ लाख १८ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

भारतीय साथरोग नियंत्रण कायदा अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ६३ ( E ) व कलम ६५ ( ३ ) नसार कोरोंना विषाणचा कोरोना कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी आवश्यक स्टेरिजन सी हे जंतूंनाशक सोल्यूशन थेट पध्दतीने खरेदी करणेकामी येणान्या ५६ लाख २५ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय साथरोग नियंत्रण कायदा अधिनियम १८९७, नुसार कोरोंना विषाणूचा कोरोना कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी आवश्यक मनपाच्या आरोग्य व इतर विभागांसाठी स्यनिटायझर खरेदी करणेकामी येणाऱ्या ५० लाख ५० हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय साथरोग नियंत्रण कायदा अधिनियम १८९४, शहरातील नागरिकांना कोरोंना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पदाधिकाऱ्यामार्फत वाटप करण्यासाठी आवश्यक १ लाख स्यंनिटायझर खरेदी करणेकामी येणाऱ्या २५ लाख इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेच्या विविध रुग्णालायांसाठी कोरोंना आयसोलेशन वार्डसाठी आवश्यक उपकरणे, साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या ९५ लाख ९१ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

भारतीय साथरोग नियंत्रण कायदा अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ , महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ६३ ( ६ ) व कलम ६७ ( ३ ) नुसार कोरोंना विषाणूचा कोरोना कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी आवश्यक लाइफबॉय साबण खरेदी करणेकामी येणान-या ३२ लाख २७ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button