breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

खासगी नोकरदारांसाठी निराशाजनक बातमी! PF वरील व्याजदर कमी होणार

PF Update : नुकत्याच हाती आलेल्या एका बातमीनुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षात EPFO ला सरप्लेसचा अंदाज घेऊनही तोटा झाला होता. EPFO कडे ४४९.३४ कोटी रुपये आगाऊ असतील तर १९७.७२ कोटी रुपयांची तूट असेल. त्यानंतर पीएफवर दिल्या जाणाऱ्या व्याजदराचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पीएफवर मिळणारे व्याज सध्या कमी आहे. त्यातच २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी पीएफवर ८.१५ टक्के व्याजदर निश्चित केले आहे.

ईपीएफमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन पीएफच्या व्याजदराचा पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे अर्थ मंत्रालयाचे मत आहे. पीएफचे उच्च व्याजदर कमी करून ते बाजारभावाच्या बरोबरीने आणण्याची गरज आहे, असंही यात म्हटले आहे. सध्या पीएफवर मिळालेल्या व्याजाची बाजाराशी तुलना केली तर ते जास्त आहे.

हेही वाचा – तुम्हाला वाहतुकीच्या दंडापासून वाचण्यास मदत करतील ‘हे’ दोन अ‍ॅप्स

लहान बचत योजनांमध्ये, फक्त एक ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे, ज्यावर सध्या पीएफपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. या योजनेचा व्याजदर सध्या ८.२० टक्के आहे. सुकन्या समृद्धी योजनेपासून ते नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पर्यंत प्रत्येक गोष्टीवर व्याजदर PF पेक्षा कमी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button