breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेसाठी पॅटर्न जाहीर

मुंबई – मुंबई विद्यापीठाने आपला अंतिम वर्ष परीक्षेसंदर्भात पॅटर्न जाहीर केला असून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी खास महाविद्यालयांचे क्लस्टर तयार केले असून प्रत्येक क्लस्टरमध्ये एक महाविद्यालय लीड करणार आहे. हे लीड महाविद्यालय त्या क्लस्टरमधील महाविद्यालयांच्या परीक्षेची निश्चित केलेल्या नियोजनाप्रमाणे परीक्षा घेण्याची जबाबदारी पार पडणार आहे. म्हणजेच विद्यापीठांनी परीक्षा घेण्याची जबाबदारी ही महाविद्यालयावर टाकली आहे.

यामध्ये अंतिम वर्ष प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, viva परीक्षा या प्रत्येक महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने झूम अँप, गुगल मीट यासारख्या अँपद्वारे व तोंडी परीक्षा फोनवरून घेण्याच्या सूचना दिल्या असून या परीक्षा 15 सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहे. शिवाय या परीक्षांचे गुण तातडीने एमकेसीएल व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे.

ऑनलाईन थेअरी परीक्षा घेताना सुरवातीला बॅकलॉग परीक्षा 25 सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहेत तर अंतिम वर्ष परीक्षा या 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहेत. या थेअरी ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी असून 50 मार्कसाठी 1 तासाचा वेळ असणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी सुविधा उपलब्ध नसल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घेण्यात यावी अशा सूचना सुद्धा देण्यात आहेत. तर अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे.

थेअरी परीक्षा बहुपर्यायी असल्याने विद्यापीठ अधिष्ठाता, महाविद्यालय प्राचार्य यांनी question bank तयार करून या परीक्षांसाठी question set तयार करण्यात येतील. शिवाय, या पद्धतीचा सराव व्हावा यासाठी महाविद्यालयांनी सॅम्पल प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यास देण्यात याव्यात असे सुद्धा या परिपत्रकात सांगितले आहे. एखादा विद्यार्थी जर परीक्षा काही कारणास्तव देऊ शकला नाही तर त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ परीक्षा घेण्यास पूर्णपणे सज्ज झाले असून सविस्तर परीक्षेबाबत वेळापत्रक क्लस्टर महाविद्यालयातील लीड महाविद्यालय सर्वांशी चर्चा करून जाहीर करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button