breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पाकिस्तानी चलन आणि ड्रग्ज घेउन घुसखोरी करताना 2 तस्करांंना भारतीय सैन्य दलाकडुन कंंठस्नान- BSF

राजस्थान: राजस्थानच्या सीमेवर श्रीगंंगानगर येथुन घुसखोरी करण्याचा काही तस्करांंचा डाव भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (BSF)  सैनिकांंनी उधळुन लावलेला आहे. घुसखोरी करत असताना बीएसएफ जवानांंनी गोळीबार करत दोन तस्करांंना जागीच कंंठस्नान घातलेले आहे. या तस्करांंकडुन पाकिस्तानी चलन व ड्रग्ज आणि तसेच हत्यारे सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत. यासंदर्भात बीएसएफ कडुनच देण्यात आलेल्या माहितीनुसार, 8 व 9 सप्टेंंबर च्या दरम्यान तस्करी घुसखोरी होईल याविषयी सुत्रांंनी माहिती दिलेली होती.

त्यानुसार श्रीगंंगानगर भागात सैन्य जवानांंना तैनात ठेवण्यात आले होते, यानुसार काल मध्यरात्रीच्या सुमारास घुसखोरीचा प्रयत्न होताचा तस्करांंना जागीच ठार करण्यात आलेले आहे. माध्यमांंच्या माहितीनुसार, तस्करांंकडे सापडलेल्या हत्यारांंमध्ये 2 पिस्तुलांंचा समावेश आहे, याशिवाय 4 मॅंंगजीन, ड्रग्ज, नाईट व्हिजन आणि पाकिस्तानी चलन जप्त करण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button