breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विमा योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा – आमदार महेश लांडगे

 पिंपरी – सर्व सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी आरोग्य विषयक योजना राबविणे सरकारचे काम आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व नागरिकांना ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटूंबासाठी पाच लाखांचा मोफत आरोग्य विमा योजना’ जाहिर केली आहे. हि योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी शहर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे शहराध्यक्ष फारुक इनामदार यांच्या वतीने ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटूंबासाठी पाच लाखांचा मोफत आरोग्य विमा पत्राचे वाटप आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ता अमोल थोरात, संयोजक फारुक इनामदार, भाजपा शहर उपाध्यक्ष अर्जून ठाकरे, भगवान शिंदे, किरण पवार आणि मंगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. वनिता गुळवणी, डॉ. संतोष धाडगे, डॉ. श्रीपाद परसपाटकी, डॉ. किशोर महाजन, डॉ. संजय भंडारी तसेच रुग्णवाहिका चालक सुहास पालांडे, विजय शेळके, विनायक पोलकम, भरत वाघ आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेणारे हाजी गुलाम रसुल सय्यद यांचा कोव्हिडयोध्दा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक 9 मधिल 54 सफाई सेवकांना पावसाळी रेनकोट देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी आ. महेश लांडगे म्हणाले की, काही पक्ष आणि नेते नागरिकांकडे फक्त व्होटबँक म्हणून पाहतात. फक्त निवडणूकीपुरत्या घोषणा करतात. परंतू अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे देशभरातील दहा कोटी गरीब कुटूंबांना सरकारी व खासगी रुग्णालयात देखिल पाच लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येतील अशी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व गरजू कुटूंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. या योजनेतून प्रत्येक कुटूंबाला पाच लाख रुपयांपर्यंत प्रतिवर्ष विमा संरक्षण लाभ मिळणार आहेत असेही आ. लांडगे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या संयोजनात प्रशांद शिंदे, पांडूरंग कुंभार, रवी पवार, विनोद इनामदार, सुभाष कुंभार, विश्वजीत दरेकर, अमोल गाडे, नागेश विश्वकर्मा, संदिप ठाकूर, यल्लापा अप्यगोळे, उमेश बनसोडे, कासिम सय्यद, परशूराम आयगोळे, राजेंद्र पवार, शंकर सानगुंदी, शिवा आयगोळे, अमोल इमडे, प्रतिक पाटील, प्रयोजन मुंडेकर, पंकज सिंह, तनिश पालांडे आदींनी सहभाग घेतला.प्रास्तविक व स्वागत फारुक इनामदार, सुत्रसंचालन सचिन शिंदे आणि आभार सागर धोत्रे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button