breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ब्रिटनची कंपनी एस्ट्राजेनेकाने कोरोना व्हॅक्सीनची ट्रायल थांबवली

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोना लस विकसित करणार्‍या लंडनमधील फार्म कंपनी एस्ट्राजेनेकाला क्लिनिकल चाचण्या थांबवाव्या लागल्या आहेत. हा निर्णय घ्यावा लागला कारण ट्रायलमध्ये समाविष्ट असलेली एक व्यक्ती आजारी पडली होती. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. असे होणे नवीन गोष्ट नसल्याचेही ते म्हणाले. तसेच असेही म्हटले आहे की रूग्णातील आजाराचे गांभीर्य अद्याप कळलेले नाही.

एस्ट्राजेनेकाने म्हटले की, ‘ जर ट्रायलच्या मध्येच एखाद्या वॉलंटियरमध्ये न समजणारा आजार (एनएक्सप्लेन्ड इलनेस) समोर आला तर ट्रायल रोखली जाते. मोठ्या ट्रायल्समध्ये कधी-कधी असे होते. मात्र याचा रिव्ह्यू अवश्य करायला हवा. ट्रायलच्या टाइमलानवर जास्त परिणाम होऊ नये यासाठी आम्ही हे तेजीने करत आहोत.

एस्ट्राजेनेकाने तीसऱ्या फेजच्या क्लीनिकल ट्रायलसाठी 30 हजार वॉलंटियरच्या रजिस्ट्रेशन 31 ऑगस्टपासून सुरू केले होते. एस्ट्राजेनेका त्या 9 कंपन्यांमधून एक आहे ज्यांच्या व्हॅक्सीनचे ट्रायल तिसऱ्या म्हणजे अखेरच्या टप्प्यात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button