breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

आरोग्य विभागातील परीक्षेचा पेपर फुटला; मुंबईत विद्यार्थ्यांचा ठिय्या

मुंबई – आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांच्या परीक्षा सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. आज आयोजित केलेल्या परीक्षेतील पेपर व्हॉट्स ॲप वर फुटल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यामुळे मुंबईतील परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. नर्सिंग आणि पॅरामेडीकलचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. सील फुटलेला पेपर पाहून विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन केलं आहे. परीक्षा सध्या थांबवल्याची झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अडीच वाजता विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवर पेपर, विद्यार्थ्यांचा दावा
दुपारच्या सत्रातील पेपरची वेळ 3 ते 5 अशी वेळ होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अडीज वाजताच व्हॉटसअ‌ॅपर पेपर आल्याचा दावा केलाय. सध्या परीक्षा केंद्रावर प्रचंड तणाव आणि गोंधळ निर्माण झाला असून पोलीस आणि परिक्षार्थी आमने सामने आले आहेत. मुंबईतील परेरा वाडी साकीनाका अंधेरी इथल्या शिवेनरी विद्या मंदिरात आरोग्य विभागाचा पेपर होणार होता. यापूर्वी हॉल तिकीट आणि सेंटर बदलल्यानं विद्यार्थी हैराण होते.

पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं होते. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले होते. नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळाला. पेपर प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. विद्यार्थी संख्ंयेच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button