breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा हाहाकार, 24 तासात 30 पोलीस कोरोनाबाधित

मुंबई, महाईन्यूज

कोरोनाबाधित रुग्ण संख्येने मुंबईसह संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 7074 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्येने दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2,00064 आहेत. तसेच 24 तासांत 295 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनानं 8671 जणांचा बळी घेतला आहे.

24 तासांत 30 पोलिस कोरोनाबाधित

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या 83237 वर पोहोचली आहे. एकट्या मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 4830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात गेल्या 24 तासांत 30 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक अधिकारी आणि तीन पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. सध्या मुंबईत 114 पोलिस अधिकारी आणि 956 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर आतापर्यंत राज्यात 68 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

सरकारची चिंता वाढली..

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राज्यात शनिवारी 3395 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचा Recovery Rate 54.2 एवढा झाला आहे. अनलॉकची सुरू असलेली प्रक्रिया आणि वाढती गर्दी यामुळे रुग्णसंख्या वाढत असून सरकारची चिंता आणखी वाढली आहे.

दुसरीकडे पुण्यात लॉकडाऊन हटवल्यानंतर महिन्याभरात Covid-19 रूग्णांची संख्या तिप्पट वाढली आहे. तसंच मृत्यूसंख्येतही दुप्पट वाढ झाली आहे. Active रूग्णसंख्याही 3 हजारांवरून थेट 6 हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे स्थानिक नेतेही पुन्हा टोटल लॉकडाऊनची मागणी करू लागले आहेत. सजग नागरिक मंचाने मात्र लॉकडाऊनला कडाडून विरोध दर्शवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button