breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारली; समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात ओबीसी मोर्चाला सुरवात झाली मात्र, मोर्चा पुढे नेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांनी शनिवारवाड्या समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

पुण्यात आज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शनिवारवाडा येथून ओबीसी मोर्चाची सुरवात होणार होती. ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा मोर्चांना परवानगी नसल्याने पुणे पोलिसांनी शनिवारवाडा येथून मोर्चा पुढे नेण्यास परवानगी नाकारली. दरम्यान, मा. खा. समीर भुजबळ यांना पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांनी शनिवारवाड्या समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. लवकरात लवकर रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहे. दरम्यान, मोजके लोक जिल्हाधिकारी कार्यलयात जाऊन निवेदन द्यावे असा तोडगा पोलिसांनी सुचवला आहे. त्यावर नेते निर्णय घेणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button