breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोविड संकटात बिळातुन बाहेर न पडणारे स्वार्थी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आज बाहेर – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

पिंपरी | प्रतिनिधी 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सन २०१७ पासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. या पंचवार्षिक मध्ये भारतीय जनता पार्टीने शहराचा मोठ्या प्रमाणात सर्वांगीण विकास करुन शहराचे पुढील ३० वर्षाचे नियोजन केलेले आहे. शहरात वैद्यकीय सुविधा, आरोग्य विषयक सुविधा, शैक्षणिक सुविधा, नागरवस्ती विकासाच्या माध्यमातुन शहरातील दिव्यांग, कष्टकरी नागरिक, विद्यार्थी, महिला यांच्यासाठी नव्याने आणलेल्या योजना, सावित्रीबाई फुले विद्यापीठा सोबत केलेले करार, स्मार्ट सिटी अंतर्गत स्कील डेव्हलटमेंट, इन्क्युबिशन सेंटर च्या माध्यमातुन युवक युवतींना स्टार्ट अप बरोबरीनेच कोविड काळात शहरातील नागरिकांना उच्च प्रतिच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्याचबरोबर

कोविड लसीकरण मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास प्राध्यान्य देवुन केंद्रसरकारने ठरवुन दिलेल्या नियोजनानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी लसीकरणाचे नियोजन केले.
राज्यामध्ये ई-गव्हर्नन्समध्ये पिंपरी चिंचवड म.न.पा.स प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून पिंपरी चिंचवड शहर देशपातळीवर प्रगत औदयोगिक शहर म्हणुन ओळखले जाते. याशिवाय या सत्ताकाळात शहराला देशपातळीवर वेगवेगळी पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. कोविड संकट काळात भाजपाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व आमदार महेशदादा लांडगे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी थेट जनतेत जावून नागरिकांना धीर दिला आहे. शिवाय या काळात नागरिकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांना शिधा वाटप करणे, वेळप्रसंगी गरजुंना जागेवर जेवण पोहोच करणे त्याचप्रमाणे परगावी जाणाऱ्या नागरिकांना वाहन सुविधा उपलब्ध करुन देण्यासह त्यांना आवश्यक त्या इतर सुविधाही उपलब्ध करुन दिल्या. त्यावेळेस ही सर्व मंडळी कुठे होती ?

आजचा मोर्चा म्हणजे निव्वळ २०२२ च्या निवडणूकीचा स्टंट आहे, कारण या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना या शहरातील जनतेचा कळवळा नसुन स्वार्थी राजकारणासाठी केलेले प्रदर्शन आहे. भ्रष्टाचार झाला म्हणणाऱ्यांनी त्यांचेकडे कुठलाही पुरावा नसताना फक्त जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे पाप आज ही मंडळी करत आहेत. खऱ्या अर्थाने २०१७ पासुन महापालिकेच्या सर्व समित्यांमध्ये यांचे सुध्दा नगरसेवक सदस्य आहेत. भ्रष्टाचार झाला असे म्हणता तर मग त्या वेळी तुम्ही व तुमचे पदाधिकारी गप्प का बसले ? तेव्हापासुनच या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरल असत तर अधिक शहाणपणाच ठरल असत. मुळात महानगरपालिकेत गेल्या २०-२५ वर्षापासून या मंडळीचीच ठेकेदारी आहे. याच मंडळींनी महापालिकेच्या विविध मिळकतींमध्ये आपली स्वत: ची व्यवसाय व दुकाने थाटली आहेत. या २०-२५ वर्षात ज्यांनी या महापालिकेला लुटून खाल्ले तीच मंडळी आज साळसूदपणाचा आव आणून प्रदर्शनाचे सोंग करत आहेत. परंतु शहरातील जनता सुज्ञ आहे त्यांना यांचे हे सोंग ओळखलेले आहे. त्यामुळे पुन्हा २०२२ च्या निवडणूकीत या भ्रष्टवादी राष्ट्रवादीला गो बॅक करणार हे नक्की.

आजच्या या प्रदर्शनावर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकारच लक्ष नाही का ? एकीकडे उद्या होणाऱ्या शिवजयंतीला तुम्ही फक्त २०० लोकांना परवानगी देतात आणि दुसरीकेड आजच्या मोर्चासाठी २०० पेक्षा जास्त लोकांना परवानगी देतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. यावरुन या ठाकरे सरकारच छत्रपती शिवाजी महारांजाच्या बद्दलच पुतणा मावशीच प्रेम दिसून येत आहे. असा आरोप सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button