breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | कोरोनातून बऱ्या झालेल्या चार जणांमध्ये अँटीबॉडीज; प्लाझ्मा थेरपीला सुरुवात

मुंबई | मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत पडलेल्या मुंबईतील आरोग्य यंत्रणेला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या मुंबईतील चार रुग्णांच्या शरीरात COVID19 विषाणूचा सामना करण्यासाठीच्या अँटीबॉडीज मिळाल्या आहेत. नुकतीच या रुग्णांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आता प्लाझ्मा थेरपीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रुग्णांच्या शरीरातील प्लाझ्मा काढून आता त्याद्वारे मुंबईतील इतर रुग्णांवर उपचार केले जातील. त्यामुळे आता पालिकेने कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

या लोकांनी प्लाझ्मा डोनेशन करावे. जेणेकरून शहरातील कोरोनाच्या इतर रुग्णांवर उपचार करता येतील, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button